Homeशिक्षण-प्रशिक्षण‘गणपती स्पेशल ऑफर’ ठरली महिलांसाठी संधीची पर्वणी; २०१ महिलांनी घेतले मोफत कौशल्य...

‘गणपती स्पेशल ऑफर’ ठरली महिलांसाठी संधीची पर्वणी; २०१ महिलांनी घेतले मोफत कौशल्य प्रशिक्षण

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहरातील महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला ‘गणपती स्पेशल ऑफर – महिलांसाठी खास कौशल्य प्रशिक्षण उपक्रम’ हा सात दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला.

या उपक्रमाला दौंड शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल २०१ महिलांनी सहभाग नोंदवत प्रशिक्षण पूर्ण केले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना नवीन कौशल्य आत्मसात करता यावे आणि भविष्यात त्या कौशल्याचा उपयोग स्वतःच्या उत्पन्नासाठी करता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सात दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये रांगोळी, फ्लॉवर मेकिंग, नथ मेकिंग, साडी ड्रेपिंग, पूजा थाळी सजावट, फॅब्रिक पेंटिंग, सेल्फ मेकअप, आरती वर्क आदी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी प्रणिता जठार, मयुरी कुलथे, पिंकी सोलंकी, काजल जगदाळे, ज्योती औटी, केतकी परकाळे आणि सरोज भेनवाल यांनी मोलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

तसेच पूजा पवार, रेखा सोनवणे, शुभांगी कांबळे, आरती मांजरेकर, धनश्री लोखंडे आणि शुभांगी पाटोळे यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

प्रशिक्षणाच्या समारोपावेळी सहभागी महिलांनी आपले अनुभव व्यक्त करताना प्रशिक्षणामुळे नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळाली, आत्मविश्वास वाढला आणि हे कौशल्य दैनंदिन जीवनासोबतच भविष्यात आर्थिकदृष्ट्याही उपयोगी ठरू शकते, अशा सकारात्मक भावना व्यक्त केल्या. महिलांनी या उपक्रमाचे तसेच नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी सांगितले की, “महिलांना केवळ प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांच्या हातात एखादे कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. २०१ महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे या महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि त्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हीच या उपक्रमाच्या यशाची खरी पावती आहे.”

दौंड शहरातील महिलांसाठी भविष्यातही कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

‘गणपती स्पेशल ऑफर’च्या माध्यमातून २०१ महिलांच्या कौशल्याला मिळालेली ही नवी दिशा, दौंड शहरातील महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीतील एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!