Homeताज्या बातम्याअक्षरांच्या सोहळ्यात रंगला साहित्यिक मेळावा, तीन साहित्यकृतींचे प्रकाशन; निमंत्रित कवींच्या कवितांनी रंगली...

अक्षरांच्या सोहळ्यात रंगला साहित्यिक मेळावा, तीन साहित्यकृतींचे प्रकाशन; निमंत्रित कवींच्या कवितांनी रंगली साहित्यिक मैफल

अक्षरवर्स पब्लिकेशन, बार्शी यांच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन व सन्मान सोहळा रविवारी’ पोतदार सभागृह’ सदाशिव पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडला.

साहित्यिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला कवी, लेखक, साहित्यप्रेमी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात कवयित्री अमृता कराड लिखित ‘एकतर्फी इश्कनामा’, रोहिणी दीपक आदलिंगे डाके संपादित ‘भक्ती’ आणि ऋतिक नानासो हंबीर संपादित ‘भावनांचा कल्लोळ’ या तीन साहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वसुधा वैभव नाईक होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला.

अक्षरातून उमलतात स्वप्न शब्दातून सजते बरसात मनीची
साहित्यप्रेमींच्या मनामनात ज्योत अक्षरवर्सची. या बहारदार ओळींनी त्यांनी सर्वांची मने जिंकली.
यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री चैताली कापसे मोडक यांनी ‘ उथळ लेखनातून मनोरंजन होते पण लेखन असे करावे की मनोबल वाढेल ‘हा सल्ला साहित्यिकांना दिला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक संजय पातुरकर यांनी भावनांचा कल्लोळ या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. सौ. संगीता लांबे यांनी आपल्या भाषणात ‘शब्दांचे धन सर्वात मोठे धन हे सांगितले’ आणि प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांनी सर्व पुस्तक प्रेमींचे स्वागत केले. त्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले लेखक व कवी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. सर्वांनी शुभेच्छा दिल्या.सर्व साहित्यिकांचे कौतुक केले. ज्यांची पुस्तके प्रकाशित झाली त्यांना शुभ आशिष दिले.

प्रकाशक तुषार पालखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून अक्षरवर्स पब्लिकेशनच्या साहित्यिक वाटचालीची तसेच या उपक्रमामागील भूमिका मांडली. नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी श्रीराम घडे, आरती ढोले पाटील, गौरव पुंडे, भालचंद्र खरळकर, वैशाली खाडे, संगम उबाळे, विनय पिंपरकर आणि दत्तात्रय वारडकर, सत्त्यभामा ताई, तुषार पालखे, योगेश हरणे, गजानन उफाडे व सुधीर कुलकर्णी
इत्यादी कवींनी आपल्या कविता उत्तम सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणीला उत्स्फूर्त दाद मिळाली. निमंत्रित कवींच्या दमदार आणि भावस्पर्शी कवितांनी संपूर्ण सोहळा रंगून गेला.
पुस्तक प्रकाशनासोबतच विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. प्रकाशन, सन्मान आणि काव्यवाचन अशा त्रिवेणी संगमामुळे हा सोहळा साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगेश हरणे, रोहिणी आदलिंगे डाके, गौरव पुंडे आणि ऋतिक हंबीर, तुषार पालखे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गजानन उफाडे यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला आणखीन रंगत आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

खडकवासला येथील धम्म विनया मॉनेस्टरीमध्ये ‘धम्मामृत धम्मपद-अठ्ठकथा खंड २’चा प्रकाशन सोहळा संपन्न

  भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा, समता आणि बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था, पुणे यांच्या वतीने धम्म विनया मॉनेस्टरी, खडकवासला,...

error: Content is protected !!