Homeक्राईमनराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार......सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला 5 लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश।

✍️ अख्तर काझी

दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि. 16 ऑक्टोबर 2026 रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3,5 ((N),6 अन्वये सश्रम कारावासाची जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3,4 अन्वये 10 वर्ष सश्रम कारावासाची व 5 हजार रुपये दंड, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 7,8 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 11,12 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली असून तसेच पीडीतेला 5 लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची माहिती अशी की,सन 2022 रोजी आरोपी व पीडिता हे वीटभट्टीवर राहण्यासाठी आले होते. दरम्यान 27 डिसेंबर 2022 पासून आरोपीने सात-आठ वेळा पिडीतेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडिता गरोदर राहिली. सदरची गोष्ट बाहेर कोणाला सांगितल्यास तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने तिला दिली. घटनेनंतर आरोपी पीडित मुलीला एकटीला वीट भट्टीवर सोडून निघून गेला होता. ही बाब कळाल्यानंतर वीट भट्टीचे मालकाच्या पत्नीने पीडीते कडून तिच्या आजीचा व मामाचा फोन नंबर मिळवून त्यांना सदरची बाब कळविली. नंतर तिला शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेल्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. घटनेबाबत स्वतः पीडितेने दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.बी. गटकुळ यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.
सदरील प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील स्नेहल कालिदास नाईक यांनी काम पाहिले. त्यांनी प्रकरणात 12 साक्षीदार तपासले. पीडित मुलीने आरोपीने तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचार केलेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. पीडित मुलीची साक्ष ही विश्वसनीय असून तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष पुष्टी देत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील स्नेहल नाईक यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणी पैरवी अधिकारी जी. के.कस्पटे तसेच दौंड पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार मनीषा अहिवळे यांनी सरकारी वकिलांना केस कामी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

खडकवासला येथील धम्म विनया मॉनेस्टरीमध्ये ‘धम्मामृत धम्मपद-अठ्ठकथा खंड २’चा प्रकाशन सोहळा संपन्न

  भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा, समता आणि बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था, पुणे यांच्या वतीने धम्म विनया मॉनेस्टरी, खडकवासला,...

दौंड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर, दौंडकर हैराण। प्रशासनाने शहरातील समस्या सोडविण्याची मराठा महासंघाची...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहर व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक वाढलेली आहे. प्रशासनाकडून या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतेही नियोजन नाही असे चित्र आहे तसेच...

error: Content is protected !!