Homeमहत्त्वाचेधनगर आरक्षणासाठी निर्णायक लढ्याची हाक; दौंड सकल धनगर समाज आक्रमक

धनगर आरक्षणासाठी निर्णायक लढ्याची हाक; दौंड सकल धनगर समाज आक्रमक

✍️संदिप बारटक्के

दौंड : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसह समाजाच्या न्याय्य हक्क, सन्मान आणि अस्मितेशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांसाठी दौंड शहरामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने आज दौंड तहसीलदार कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले. सकल धनगर समाजबांधवांच्या उपस्थितीत हे निवेदन दौंड तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

या निवेदनामध्ये धनगर समाजाच्या प्रमुख प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन लढा पूर्ण ताकदीने आणि प्रभावीपणे लढावा, अशी मागणी करण्यात आली.

धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात ८ सप्टेंबर २०२६ पूर्वी ठोस, सकारात्मक तसेच सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र शासनाने दाखल करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात अनुभवी आणि सक्षम वकिलांची नियुक्ती करून धनगर समाजाची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष शासकीय कायदा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये किमान २१ विश्वस्त असावेत, त्यापैकी किमान ११ विश्वस्त धनगर समाजातील असावेत तसेच अध्यक्षपदही धनगर समाजातील व्यक्तीस देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील महत्त्वाच्या ‘Missing Link’ प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. ऐतिहासिक योगदानाची दखल घेत त्यांच्या नावाला योग्य सन्मान मिळावा, अशी धनगर समाजाची भूमिका आहे.

मुंबईतील ऐतिहासिक चर्चगेट रेल्वे स्थानकास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव म्हणून हे नामकरण करण्यात यावे, अशी धनगर समाजाची मागणी आहे.

धनगर समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक, संवेदनशील आणि तातडीची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली. हे निवेदन केवळ मागण्यांचे नसून समाजाच्या न्याय्य हक्क, सन्मान आणि अस्मितेसाठीची ठाम भूमिका असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले.

धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठीचा लढा शांततामय, लोकशाही आणि संविधानिक मार्गाने संघटितपणे पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!