वृत्तवेध मarath /संदिप बारटक्के
दौंड — राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्र घडवण्यासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. त्यांच्या जाज्वल्य विचारांना केवळ शब्दांपुरते न ठेवता ते कृतीत आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, शिवराजनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
यावेळी समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती सविता दत्तात्रय मगर (पिंपळगाव), श्रीमती रोहिणी रमेश कुलकर्णी (पाटस), सौ. संगिता बबन भोसले (दौंड), सौ. सविता रामदास येडे (गार), डॉ. शोभा बबन वाईकर (केडगाव), सौ. अनिता सुहास गायकवाड (दौंड), सौ. प्रणोती मंगेश चलवादी (दौंड), मंदा सोपान नांदखिले (बेटवाडी),सौ. अश्विनी विजय बगाडे (मसनेरवाडी) व श्रीमती रत्नमाला महादेव पासलकर (नानविज) या महिलांना ” राजमाता जिजाऊ पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास मोनिका वीर, पूर्वा शहा, तसेच नगरसेविका स्वाती सावंत, उज्वला परकाळे, नमिरा पानसरे, कार्तिकी सोनवणे, रेणुका थोरात, मनिषा जाधव, राणी लष्करे, प्रणिती शिंदे, सरोज कांबळे व ज्योती राऊत यांची उपस्थिती होती.
प्रा. मेघा गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर प्रभावी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता भोर यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मोटे, सुषमा दरेकर व कांचन देसाई यांनी केले, तर आभार सरिता कुल यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. अरुणा मोरे, रुपाली पवार व नगरसेविका वैशाली माशाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























