Homeमहत्त्वाचेसर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश; पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला.

✍️ अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले आहे. संबंधित प्रकरणात रोहित राजेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर महत्त्वाची सुनावणी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी झाली.
सर्वोच्च न्यायालयातील न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यानंतर महाराष्ट्र शासन व इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, ही नोटीस २६ नोव्हेंबर २०२६ रोजी परत करण्यायोग्य ठेवण्यात आली आहे. तसेच प्रतिवादींना आजपासून चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर याचिकाकर्त्यास उत्तरावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
रोहित पाटील यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील ॲड.ध्रुव मेहता ,ॲड.सुशांत प्रभूणे, ॲड.सक्षम माहेश्वरी, ॲड. निशी सांगतानी, ॲड.संकल्प सक्सेना यांनी काम पाहिले.
या आदेशामुळे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीच्या टप्प्यात पोहोचले असून, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत नोंदीनुसार सदर प्रकरण दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशामध्ये नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत शासनाचे म्हणणे आणि याचिकाकर्त्याचा प्रतिवाद यावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

error: Content is protected !!