Homeताज्या बातम्यादौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला..... पत्रकारांचा...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार। पत्रकारांची शेडगे यांच्या विरोधात थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार।

✍️ अख्तर काझी

दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ पत्रकारांशी वाद झाला. यावेळी शेडगे यांच्या अशोभनीय व धमकीवजा वर्तनामुळे वाद विकोपाला गेला. त्यामुळे उपस्थित पत्रकारांनी सर्वानुमते या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. या वादग्रस्त घटनेनंतर दौंड शहर व ग्रामीण पत्रकारांची बैठक झाली व हेमंत शेडगे यांच्या वादग्रस्त भूमिकेची तक्रार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्याचा निर्णय झाला.

यावेळी काही ज्येष्ठ पत्रकारांनी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांचीच याबाबत भेट घेण्याचे ठरले.दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी येथील सर्व पत्रकारांनी कोल्हापूर येथे रंजन कुमार शर्मा यांची भेट घेतली व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे अशोभनीय व धमकीवजा वर्तनाची चौकशी करून कारवाई करण्याबाबत व इतर मागण्यांबाबत निवेदन दिले.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दि. 13 ऑगस्ट रोजी दौंड पोलीस स्टेशनला रोहित्र चोरी प्रकरणातील अटक आरोपींची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.दुपारी 12.45 वा. व्हाट्सअप द्वारे पत्रकारांना 1.30 वा. पत्रकार परिषद असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पत्रकार वेळेत पोलीस स्टेशनला हजर झाले. मात्र दुपारी पावणे दोन पर्यंत अटक आरोपींना लॉक अप मधून बाहेर आणण्यात आले नव्हते तसेच प्रेस नोटही तयार नव्हती त्यामुळे पत्रकार परिषद सुरू होण्यास विलंब झाला. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी, आपल्याकडे वेळ आहे काही चर्चा करायची असेल तर करूया असे सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार उमेश कुलकर्णी यांनी विवेक गटने आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याबाबत तसेच एका तरुणीच्या अपहरण प्रकरणामध्ये प्रथम मिसिंगची नोंद होऊन दोन दिवसानंतर अपहरणाची तक्रार कशी दाखल झाली याबाबत प्रश्न विचारले. यावर शेडगे यांनी ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती आहेत ते प्रश्न तुम्ही का विचारता? असे खोचक उत्तर दिल्याचे उपस्थित पत्रकार सांगतात. पुढे त्यांनी, तुमच्याविषयी आमच्याकडे बरीच माहिती आहे, आम्ही काय करतो का? उगाच काड्या का करता? तसेच इथल्या प्रत्येकाची माहिती आमच्याकडे आहे, तुम्ही काय करता हे आम्हाला माहिती आहे अशी धमकीवजा व अशोभनीय वक्तव्य शेडगे यांनी केले आहे. सदर वक्तव्यांमुळे पत्रकारांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उपस्थित पत्रकारांनी पत्रकार परिषदेतून बाहेर पडणे पसंत केले. पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार गंभीर असून तो पोलीस दलाच्या शिस्तीला व प्रतिष्ठेला न शोभणारा आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पत्रकारांनी विशेष महानिरीक्षकाकडे केलेल्या मागण्या: सदर घटनेची वरिष्ठ व स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करावी. उपस्थित पत्रकार, पोलीस कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवावेत.
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ,उपलब्ध ऑडिओ- व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हाट्सअप संदेश, स्टेशन डायरी व पत्रकार परिषदेची नोंद सुरक्षित ठेवून तपासात समाविष्ट करावी.
चौकशीमध्ये शेडगे यांच्यावर सेवा नियमानुसार तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी.
चौकशी दरम्यान पत्रकारांवर कोणताही दबाव किंवा सूडबुद्धीची कारवाई होऊ नये याची दक्षता घ्यावी.

विवेक गटने आत्महत्या प्रकरण, तरुणीच्या अपहरण प्रकरणातील तपास तसेच वायरलेस फाटा परिसरातील लॉज वरील कारवाईची स्वतंत्र चौकशी करावी.
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार, पत्त्यांचे क्लब, वेश्याव्यवसाय व गावठी दारूचे अड्डे आढळलेल्या बीटची चौकशी करून संबंधित बीट अंमलदारांची जबाबदारी निश्चित करावी.
दौंड पोलीस ठाणे हद्दीत ज्यांच्यावर पोलीस अधिकारी( एस डी पी ओ ऑफिस मधील उपनिरीक्षक मोहिते) व कर्मचाऱ्यांवर हात उचलणे, ऑनलाइन मटका, बनावट नोटा, एमडी ड्रग्ज, जुगार, अवैध दारू विक्री, जीवे मारण्याचा प्रयत्न, बलात्कार ,विनयभंग, गोवंश हत्या व गोमांस विक्री, सार्वजनिक शांतता भंग करणे आदि गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर हद्दपारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे ते सोकावले आहेत. क्षुल्लक संशयीतांवर हद्दपारची कारवाई केली जात आहे. तरी गंभीर गुन्हे दाखल असलेले आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करावी.
पोलीस निरीक्षक हे त्यांच्या सोयीने दाखल गुन्ह्यांची माहिती देतात, त्यांनी सर्व ठाणे अंमलदार यांना पत्रकारांना माहिती न देण्याची ताकीद दिलेली आहे. त्यामुळे माहिती मिळत नसल्याने आपल्या स्तरावर स्पष्ट निर्देश द्यावेत.
दौंड येथील ॲक्सिस बँक शाखेत आढळलेल्या बनावट चलनी नोटांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून, आवश्यकतेनुसार भारतीय रिझर्व बँक, केंद्रीय अर्थ मंत्रालय व महाराष्ट्र शासनाकडे अहवाल पाठवावा. आदी मागण्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.

ही तक्रार कोणत्याही वैयक्तिक द्वेषातून नसून, पत्रकारांना निर्भयपणे प्रश्न विचारता यावेत, पोलीस आणि प्रसार माध्यमांमध्ये सन्मानपूर्वक संवाद रहावा आणि प्रलंबित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या उद्देशाने करण्यात येत आहे. विशेष महानिरीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

गवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

  पवन साळवे गवळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवळवाडी येथे डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान...

बेटवाडी हद्दीत दुचाकीला भरधाव कारची धडक; दोघे जखमी

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड-पाटस रोडवरील बेटवाडी गावच्या हद्दीत दुचाकीला मागून भरधाव वेगाने धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी Hyundai i20 Asta क्रमांक MH12PZ6838 वरील अज्ञात...

error: Content is protected !!