✍️ अख्तर काझी
दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी व अंमलदार यांना गृह मंत्रालय( भारत सरकार) च्या वतीने अति उत्कृष्ट, उत्कृष्ट सेवापदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाच्या वतीने, लोहमार्ग पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांना उत्कृष्ट सेवा पदक(2026) प्रदान करण्यात आला असून दौंड लोहमार्ग पोलीस दलातील सहाय्यक पोलीस फौजदार फारुख सय्यद, सहाय्यक पोलीस फौजदार संजय थोरबोले, पोलीस हवालदार आनंद वाघमारे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आला आहे तसेच पोलीस हवालदार सचिन राठोड यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळा कार्यक्रमामध्ये या अंमलदारांचा पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या हस्ते पदक देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. अशाच प्रकारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी प्रामाणिकपणे ,निष्ठेने व समर्पण भावनेने कर्तव्य बजावून समाजाच्या सुरक्षितेसाठी योगदान द्यावे तसेच उत्कृष्ट सेवेची परंपरा कायम ठेवावी असे आवाहनही केले.
स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा झालेला सन्मान हा संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानाचा व प्रेरणादायी क्षण ठरला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























