Homeआरोग्यगवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

गवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

पवन साळवे

गवळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवळवाडी येथे डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुहास अण्णा कांदे व अंजुम कांदे यांच्या प्रेरणेतून या समाजोपयोगी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या शिबिरात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमामध्ये नांदगावचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिबिरासाठी श्री साईनाथ ब्लड सेंटर तसेच रेडियंट प्लस हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरम्यान, गवळवाडी येथील गायत्री झारखंडे यांची पोलीस सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा ज्ञानरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अतुल तायडे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रक्तदात्यांसाठी आरोग्यविषयक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

खडकवासला येथील धम्म विनया मॉनेस्टरीमध्ये ‘धम्मामृत धम्मपद-अठ्ठकथा खंड २’चा प्रकाशन सोहळा संपन्न

  भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा, समता आणि बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था, पुणे यांच्या वतीने धम्म विनया मॉनेस्टरी, खडकवासला,...

error: Content is protected !!