Homeआरोग्यमाजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतेची रक्तमय सेवा; दौंडमध्ये १०१ रक्तदात्यांचे...

माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतेची रक्तमय सेवा; दौंडमध्ये १०१ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

✍️ – संदिप बारटक्के

दौंड : सामाजिक बांधिलकी जपत आणि रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भीमथडी शिक्षण संस्थेचे स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल १०१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र आणि प्रा. श्रीकृष्ण ननवरे यांच्या नियोजनातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाची गरज आणि त्याचे सामाजिक महत्त्व रुजावे, तसेच गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी शिबिराच्या पूर्वतयारीसाठी आठवडाभर जनजागृती केली. यावेळी रक्तदात्यांची नोंदणीही करण्यात आली.

शिबिरासाठी अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून रक्तसंकलन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, दौंड नगर परिषदेचे नगरसेवक व नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये युवकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. पी. वाघमोडे, प्रा. ज्ञानेश्वर गाडेकर, प्रा. विकास शेलार, प्रा. अर्जुन चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर तुवर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे आणि स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!