✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेच्या उपाध्यक्षपदी गोरख साळुंके, सचिवपदी रविंद्र बंड, तर कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत बंड होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नाभिक समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम करून समाजाची एकजूट अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास दत्ता राऊत, निखिल बंड, रोहीदास जाधव, रूपेश बंड, राजू शिंदे, गणेश शिंदे, मधुकर साळुंके, संतोष जाधव, नितीन जाधव, स्वप्नील शिंदे, नागेश जाधव, ह.भ.प. गजानन जाधव, राजू बोत्रे, निखिल रंधवे, उमेश गायकवाड, सुनील ताठे, धनंजय ताठे यांच्यासह नाभिक समाजातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून दौंड शहरातील नाभिक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष भगवान बंड यांनी सांगितले. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























