Homeशहरदौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही...

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दौंड नगरपालिका हद्दीतील जुन्या सार्वजनिक मुताऱ्या तोडून टाकण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी नवीन मुतारी उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले. मात्र, नव्या मुतारीचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने शहरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नवीन मुतारीच्या बांधकामाला सुरुवातीला काही दिवस सुरुवात करण्यात आली. मात्र, त्यानंतर ठेकेदाराने अचानक काम बंद केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या बांधकाम अर्धवट अवस्थेत असून, परिसरात नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः बाजारपेठेत येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, सुरू असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तसेच पायाभूत कामाबाबत योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. बांधकामाच्या पायाभूत भागाला आवश्यक तेवढे पाणी न मारल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात हे बांधकाम टिकाऊ राहील का, असा सवाल उपस्थित होत आहे.

कामातील अनियमितता, बांधकामाची गुणवत्ता आणि संथ गती याबाबत संबंधित विभागाने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच काम वेळेत पूर्ण का झाले नाही आणि अपूर्ण कामाबाबत नगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत कोणती कारवाई केली, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

दौंडकरांना पुन्हा मुतारी बांधून देतो का कोणी?’ असा संतप्त सवाल

शहरातील जुन्या सार्वजनिक मुताऱ्या पाडण्यात आल्या, मात्र त्यांच्या पर्यायी सुविधा अद्याप नागरिकांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे आधीची सुविधा काढून घेण्यापूर्वी नवीन सुविधा तयार करण्याचे नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सार्वजनिक स्वच्छतागृह ही नागरिकांची मूलभूत गरज असून, त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. नगरपालिका प्रशासनाने तातडीने अपूर्ण बांधकामाची पाहणी करून कामातील त्रुटी दूर कराव्यात, निकृष्ट काम आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि नवीन मुतारीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

एकीकडे स्वच्छ शहराचा दावा केला जात असताना दुसरीकडे सार्वजनिक मुतारीचे बांधकाम महिनोनमहिने रखडत असेल तर नागरिकांनी सुविधा मिळवायची तरी कुठे? ‘दौंडकरांना पुन्हा मुतारी बांधून देतो का कोणी?’ असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

error: Content is protected !!