Homeक्राईमपतीचा पत्नीवर चाकू हल्ला... गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी येथील घटना।

✍️अख्तर काझी

दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. महिलेच्या गळ्यावर चाकूचा वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी महिलेचा पती विशाल प्रकाश जाधव(रा. गोवा गल्ली,दौंड) व ऋषी अशोक डोके(रा. वडारपूर,जि. मुर्तीजापुर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 3(5),109(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदरची घटना बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वा. च्या दरम्यान येथील डिफेन्स कॉलनी परिसरात घडली. पीडिता आपली मैत्रीण व मुलांसोबत दुचाकीवरून( स्कुटी) शहरात जात होती. पती विशाल जाधव व त्याच्या मित्राने त्यांचा पाठलाग केला. याच परिसरातील एका हॉटेल समोर त्यांनी महिलेला बोलायचे आहे असे सांगून तिची स्कुटी थांबविली. व तीला जवळच असलेल्या मोकळ्या जागेत नेले. यावेळी ऋषी डोके याने महिलेला पकडून तिच्या तोंडाला रुमाल लावण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता विशाल जाधव याने आपल्याकडील चाकू काढून जीवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान त्याने महिलेच्या गळ्यावर चाकू फिरविल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन ती गंभीर जखमी झाली. आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तिने आरडाओरडा केला, महिलेचा आवाज ऐकून जवळच बसलेले तरुण तिच्या मदतीसाठी धावले. योगायोगाने याचवेळी रस्त्यावरून दुचाकी वर पोलीस येताना दिसल्याने तिने पोलिसांना थांबवून मदतीसाठी विनंती केली. पोलिसांना पाहताच हल्लेखोर दुचाकीवरून प्रसार झाले असल्याचे महिलेने सांगितले आहे. घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपाटे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

error: Content is protected !!