Homeशिक्षण-प्रशिक्षणपोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकलं येथे कला–विज्ञान प्रदर्शनाचा भव्य सोहळा

पोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकलं येथे कला–विज्ञान प्रदर्शनाचा भव्य सोहळा

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

Podar International School Rohkal  येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भव्य कला व विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते फित कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. दत्तात्रय रामचंद्र बनकर (प्राचार्य, विश्वकर्मा क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूट, पुणे), शिवराज टेटमे (चित्रकार व शिल्पकार, के. के. वाघ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, नाशिक) तसेच प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे प्रदर्शन “Art Shapes the Future” या संकल्पनेवर आधारित होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग स्किल, इंटिरियर डिझाईन, आर्किटेक्चरल स्किल, ग्राफिक डिझाईन तसेच टेक्स्टाईल डिझाईन या क्षेत्रांची ओळख करून देण्यात आली.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती, कागदकाम, नाविन्यपूर्ण रचनाचित्रे, कल्पनाचित्रे, निसर्गचित्रे, स्थिरचित्रे तसेच टेक्स्टाईल डिझाईन यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने आपली कला सादर केली.

सायन्स प्रदर्शनामध्ये सोलर सिस्टीम, ठिबक सिंचन, पूर मापक यंत्र, भूकंप तीव्रता मापक, शेती उपयोगी यंत्रे, कचरा व्यवस्थापन तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांवरील विविध प्रकल्प सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त आणि उल्लेखनीय होता. यावेळी शिल्पकलेतील ‘पोर्ट्रेट’ या प्रकाराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शिल्पकार शिवराज टेटमे यांनी सादर केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिल्पकलेची सखोल माहिती मिळाली.

या चित्र प्रदर्शनासाठी कला शिक्षक महेश मोरे व प्रभाकर आसवले यांचे मार्गदर्शन लाभले, तर विज्ञान प्रदर्शनासाठी शिक्षिका पूनम जाधव, माला महांती आणि अमृता पोतदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना डॉ. दत्तात्रय बनकर यांनी कला व डिझाईन क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता जोपासून भविष्यात उज्ज्वल करिअर घडवावे, असा संदेश त्यांनी दिला.

प्राचार्य विशाल जाधव यांनी अशा प्रकारची प्रदर्शने प्रशालेत दरवर्षी आयोजित केली जात असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य यापैकी किमान एक कला आत्मसात करावी, असे प्रतिपादन केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कला व विज्ञान विषयातील जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेला नवे बळ मिळाले असून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले.

सूत्रसंचालन शिक्षक विवेक पिसाळ आणि प्रणाली सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!