Homeशिक्षण-प्रशिक्षणजिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरेवाडी येथे बाल आनंदी बाजारास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरेवाडी येथे बाल आनंदी बाजारास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दौंड ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश बागल 

दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथील दि. २८ फेब्रुवारी २०२६ शनिवार रोजी जि. प. प्राथमिक शाळा पांढरेवाडी येथे बाल आनंदी बाजाराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाल आनंदी बाजारात विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला, फळे बाजारात विक्रीसाठी मांडली होती. तसेच खाऊगल्ली हे आनंदी बाजारातील वैशिष्ट्य ठरले मुलांनी घरी बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. भेळ, मिसळ वडापाव, इडली सांबर, व्हेज मंचुरियन, गुलाबजाम, पावभाजी, उडीद वडे व इतर विविध रुचकर पदार्थ खाऊ गल्लीत उपलब्ध होते.बाजारात भाजीपाला आणि खाऊ गल्लीत एकूण ७० दुकाने लावण्यात आली होती. यामध्ये सुमारे ३५००० रुपयांची उलाढाल झाली. यातून विद्यार्थ्यांना खरेदी – विक्री व आर्थिक व्यवहार ज्ञानाचा अनुभव मिळाला. या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी पांढरेवाडी गावच्या सरपंच नीताताई राजेंद्र कोंडे,

कुरकुंभ केंद्राच्या केंद्रप्रमुख आशाताई धाडगे, उपसरपंच वैशाली झगडे,ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा जाधव, राजेंद्र भागवत, अमर गायकवाड, अनिल झगडे,पोलीस पाटील विलास येचकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास निंबाळकर,उपाध्यक्ष संदीप जगताप दौंड पंचायत समिती माजी उपसभापती राजेंद्र कोंडे, माजी सरपंच मोहन बनकर,माजी चेअरमन झुंबर शितोळे, माजी व्हाईस चेअरमन इस्माईल सय्यद, माझी तंटामुक्त अध्यक्ष उत्तम निंबाळकर, शिवाजी शितोळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिमान निंबाळकर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अमोल शितोळे, यांच्या सह अनेक मान्यवर तरुण मंडळातील कार्यकर्ते व महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ बोंगाळे यांची होती. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. मच्छिंद्र रामगुडे, महेंद्र भोसले,छाया साळवे, उज्वला जगताप,उर्मिला गुजर, अविनाश अडसूळ या शिक्षकांनी परिश्रम घेतले. बाजार संपल्यानंतर ग्रामस्थांनी असे उपक्रम वारंवार घेतले जावेत अशी भावना व आपले मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!