Homeराजकीयवाहतूक कोंडीपासून शेतकरी-क्रीडा विकासापर्यंत; आमदार राहुल कुल यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ महत्त्वाच्या मागण्यांसाठी...

वाहतूक कोंडीपासून शेतकरी-क्रीडा विकासापर्यंत; आमदार राहुल कुल यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ महत्त्वाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, जलसंधारण आणि क्रीडा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठका आयोजित करून प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी करण्यात आली.

पुणे-सोलापूर (हडपसर-यवत) तसेच पुणे-शिरूर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून, कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन पर्यायी रस्त्यांचे पूर्वनियोजन करण्यात यावे, अशी मागणी आमदार कुल यांनी केली.

ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भांडगाव, खडकी, देऊळगाव राजे, पारगाव आणि पाटस येथे उपक्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी आवश्यक शासकीय जागा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी केडगाव आणि पाटस येथे उपबाजार आवार उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही वेगाने करण्याची मागणीही करण्यात आली.

दौंड तालुक्यातील भूजल पातळी वाढविणे आणि पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने वन विभागाच्या हद्दीतील पाटस, केडगाव, भांडगाव आणि ताम्हणवाडी परिसरात नवीन तलाव उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कामाला गती देण्यासाठी वन विभाग व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्याची आवश्यकता आमदार कुल यांनी अधोरेखित केली.

तसेच बिहार राज्यात मनरेगा अंतर्गत यशस्वी ठरलेल्या ‘बिहार पॅटर्न’ वृक्षलागवडीच्या धर्तीवर दौंड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय बाबींवर विशेष बैठक घेण्याची मागणी करण्यात आली.

वन जमिनींच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ७/१२ उताऱ्यांवरील वनक्षेत्राच्या नोंदी अद्यावत करण्यासाठी महसूल व वन विभागाची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार कुल यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आमदार राहुल कुल यांनी मांडलेल्या सर्व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या. दौंड तालुक्याच्या विकासाशी संबंधित हे विषय अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत येत्या काही दिवसांत विशेष बैठका आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

दौंड तालुक्यातील वाहतूक, क्रीडा, जलसंधारण, वृक्षारोपण आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांबाबत प्रशासन स्तरावर हालचाली सुरू होण्याची चिन्हे या बैठकीमुळे निर्माण झाली असून, आता प्रस्तावित बैठका आणि त्यानंतर होणाऱ्या निर्णयांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!