Homeशिक्षण-प्रशिक्षणदौंडच्या पावन भूमीतून उभे राहिले यशाचे ‘खाकी’ वीर; भीमथडी संस्थेत गुणवंतांचा भव्य...

दौंडच्या पावन भूमीतून उभे राहिले यशाचे ‘खाकी’ वीर; भीमथडी संस्थेत गुणवंतांचा भव्य सन्मान सोहळा

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर यशाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या भीमथडी शिक्षण संस्थेच्या स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच संस्थेच्या मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शासकीय सेवेत आपले स्थान निर्माण करणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.

या प्रेरणादायी सोहळ्यात प्रदीप साळुंखे (पुणे पोलीस), स्वप्नील गायकवाड (पुणे शहर पोलीस), आकाश वन्ने (रायगड जिल्हा पोलीस), प्रथमेश राठोड (महाराष्ट्र सुरक्षा बल – MSF) आणि करण बळवतकर (MPSC मार्फत महसूल सहाय्यक व कालवा निरीक्षक) या विद्यार्थ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रथमेश राठोड यांच्या मातोश्रींची उपस्थिती हा क्षण अधिक भावनिक ठरला; त्यांच्या कष्टांचे फळ मिळाल्याची जाणीव उपस्थितांना झाली.

यावेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याची परंपरा जपत पर्यावरणदूत प्रल्हाद जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दौंड परिसरात वृक्षारोपण, महाकाय वृक्षांचे शास्त्रीय पुनर्रोपण तसेच प्राणी-पक्षी आणि सर्पमित्र म्हणून त्यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विद्यार्थ्यांच्या यशामागे क्रीडा मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. क्रीडा मार्गदर्शक माधव बागल सर यांच्या प्रशिक्षण, शिस्तबद्ध मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे विद्यार्थी ‘खाकी’ सेवेसाठी सक्षम बनले आहेत. यावेळी बागल सरांचा संपूर्ण विद्यार्थी परिवार—सुमित दळवी, रोहित ठाकूर, रोहित त्रिभुवन, चैतन्य यांसह अनेक तरुण खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या गुरुंच्या कार्याचा गौरव अनुभवला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “शासकीय सेवेत कार्य करताना समाजहित जपावे आणि आपल्या कार्यातून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा,” असा संदेश त्यांनी दिला.

या सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, क्रीडा शिक्षक भोसले सर, फारूक शेख सर, क्रीडा मार्गदर्शक माधव बागल सर, श्रीकृष्ण ननवरे सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या गौरव सोहळ्यामुळे दौंड परिसरातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करता येते, याची प्रचीती पुन्हा एकदा सर्वांना आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!