Homeशिक्षण-प्रशिक्षण" द सायन्शिआ स्कूल " कडून मातृ-पितृ  दिवस मोठ्या उत्साहात साजरा "

” द सायन्शिआ स्कूल ” कडून मातृ-पितृ  दिवस मोठ्या उत्साहात साजरा “

दौंड ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश बागल़

दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील  “द सायन्शिआ स्कूल ” शाळेत  शनिवारी (दि.१४) रोजी मातृ पितृ दिवस साजरा करण्यात आला.

” द सायन्शिआ स्कूल “जिरेगाव हे पंचकोष तत्त्वावर आधारित तसेच आधुनिक व पारंपारिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण देत आहे. या स्कूलमध्ये मुलांना ज्ञान विज्ञान व संस्काराचे धडे दिले जातात. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे आई-वडिलांविषयी कृतज्ञ व्यक्त करण्याकरिता मातृ पितृ दिवस पूजनाचे आयोजन केले होते.

सर्वाहूनी मज आई बाबा तुम्ही लाडके,

नको मज पैसे सुख सोयी आणिक काही,

प्रेमाच्या तुमच्या सर कशातही नाही,

या कवितेच्या पंक्तीप्रमाणे आई वडील मुलांचे लहानपणापासून पालन पोषण करत असतात व मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी आई-वडील अहोरात्र कष्ट करत असतात यादिनानिमित्त मुलांनी आई-वडिलांविषयी त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांच्या चिमुकल्या हाताने आई-वडिलांचे चरण धुवून त्यांचे पूजा करून आशीर्वाद घेतले. मुलांना पदराखाली वाढवणारी माय असते तर त्याच पदराचा भार उचलणारा वडील असतो याची जाणीव आजच्या पिढीला करण्याकरीता  लहानपणापासून याचे शिक्षण या स्कूलमधून दिले जात आहे असे मत कीर्ती कुलंगे, राहुल शितोळे व सुभाष कदम यांनी मांडले.

सध्या वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. मुलांमधील व पालकांमधील संवाद कमी झालेले आहेत तसेच आज या आधुनिक काळामध्ये आई-वडिलांचे महत्त्व सध्या फार कमी होताना दिसत आहेत.  आपल्या  रूढी ,परंपरा व संस्कृती ही मुले विसरत चाललेली आहेत. आणि याच मुलांना आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता व  संस्काराची जपणूक करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ सातपुते ,सचिव श्वेता मोरे, सुरेखा सातपुते ,क्रांती भागवत ,शुभम भागवत तसेच स्कूलचे मुख्याध्यापक अमोल मोरे पत्रकार सुभाष कदम,सुरेश बागल, शिक्षक  संतोषी साळुंके ,अश्विनी गिरमे, रूपाली शेजाळ, अश्विनी खंडाळे, आरती कटके, योगेश्वरी यादव ,पूजा तिडके ,रामराज तिडके, राणी सोनवणे ,अभिलाषा कुंभार ,विकास घोडे ,संजय दोडके ,कल्याण पवार व सर्व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!