Homeशिक्षण-प्रशिक्षण२८ व्या कि.गु. कटारिया २०-२० स्पर्धेत ‘गेम चेंजर’चा जलवा; दौंडकरांना क्रिकेटची मेजवानी

२८ व्या कि.गु. कटारिया २०-२० स्पर्धेत ‘गेम चेंजर’चा जलवा; दौंडकरांना क्रिकेटची मेजवानी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड — दौंड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील मानाचा तुरा मानल्या जाणाऱ्या ‘कि. गु. कटारिया २०-२० क्रिकेट स्पर्धेचा’ २८ वा यशस्वी अध्याय मोठ्या उत्साहात आणि थरारात पार पडला.

स्वातंत्र्यसैनिक स्व. बाबुशेठ बोरीकर यांच्या स्मृतीनिमित्त भिमथडी शिक्षण संस्था व सेंट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेने दौंडकर क्रीडाप्रेमींना उच्च दर्जाच्या क्रिकेटची पर्वणी दिली.

अंतिम सामन्यात पुण्यातील ‘गेम चेंजर’ संघाने नावाप्रमाणेच खेळाचे चित्र पालटवत दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यांनी भव्य चषकासह ₹ २,००,०००/- रोख पारितोषिक पटकावले. उपविजेतेपद KBNCA गुलबर्गा संघाला मिळाले. त्यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ₹ १,२१,०००/- रोख बक्षीस व चषक मिळवला.

ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता दौंड शहरासाठी क्रीडा महोत्सव ठरली. थरारक सामने, उत्तुंग फटकेबाजी, अचूक गोलंदाजी आणि शिस्तबद्ध संघभावना यामुळे प्रत्येक सामना उत्कंठावर्धक ठरला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या क्रीडाप्रेमींनी खेळाडूंना भरभरून दाद दिली.

क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना आमदार कुल यांनी सांगितले की, “अशा क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ मिळते. यामुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात.” यावेळी त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचाही विशेष सत्कार केला.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुढीलप्रमाणे सन्मानित करण्यात आले —

मालिकावीर: नौशाद शेख (₹ १०,०००/-)

सर्वोत्तम फलंदाज: अथर्व वणवे (MES पुणे)

सर्वोत्तम गोलंदाज: मोहम्मद खालिद (गुलबर्गा)

उदयोन्मुख खेळाडू: शुभम देवकाते

अंतिम सामनावीर: सूरज शिंदे

याशिवाय यष्टीरक्षक अनुराग वाजपेयी, पंच अशोक घोटपागार व इस्माईल पठाण, मॅच रेफरी रिझवान पटेल तसेच समालोचक अनिल नेवासकर आणि इतर तांत्रिक सहाय्यक यांनाही रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

या सोहळ्यास भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुखजी कटारिया, उपाध्यक्ष गोविंदशेठ अग्रवाल, चेअरमन विक्रमशेठ कटारिया, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, साईराज सतीश माळी, संजय सोनवणे, दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा छायाताई थोरात तसेच नागरिक हित संरक्षण मंडळाचे सर्व नगरसेवक व मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

गेली २८ वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व दर्जेदार पद्धतीने करण्यात आले. रेल्वे प्रशासनाचे सहकार्य, मैदान सेवक अब्बीभाई यांचे परिश्रम आणि स्वयंसेवकांच्या अथक मेहनतीमुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली. आयोजक समितीने रेल्वे प्रशासन, नगरपालिका कर्मचारी व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन राजेश पाटील, नगरसेवक गटनेते योगेश कटारिया, माधव बागल व संपूर्ण टीम, फारुख शेख व संपूर्ण टीम, प्राचार्य सुभाष समुद्र, श्रीकृष्ण ननवरे तसेच के. जी. कटारिया महाविद्यालयाच्या संपूर्ण स्टाफ यांनी यशस्वीपणे पार पाडले.

दौंडच्या या क्रीडा महोत्सवाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, उत्कृष्ट खेळ आणि उत्तम नियोजन यांचा संगम झाला की क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!