Homeक्राईमवाहतुकीचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरला | दौंडमध्ये उसाच्या ट्रकवरील रस्सी उडून दुचाकीस्वाराचा मृत्यू;...

वाहतुकीचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरला | दौंडमध्ये उसाच्या ट्रकवरील रस्सी उडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक महिला गंभीर जखमी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड – दौंड शहरात सोमवारी (ता. ५) सकाळी साडेनऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दौंड–नगर रस्त्यावर योगराज हॉटेलसमोर उसाने भरलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकवरील मोकळ्या रस्सीमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत शाहिद करीम शेख (वय ३२, रा. ओम शांतीनगर, गजानन सोसायटी, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा भाऊ अकबर करीम शेख व वहिनी नसरीन अकबर शेख हे होंडा अ‍ॅक्टिव्हा (MH 42 BQ 4965) वरून शालीमार चौकाकडून गजानन सोसायटीकडे जात असताना, टाटा कंपनीचा उसाने भरलेला ट्रक (MH 12 FZ 7493) भरधाव वेगात व बेदरकारपणे जात होता.

ट्रकवरील उसाची रस्सी योग्य खबरदारी न घेता मोकळी ठेवण्यात आल्याने ती अचानक उडून दुचाकीस्वारांच्या अंगावर पडली. रस्सी गळ्याभोवती आवळल्याने अकबर करीम शेख यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर नसरीन अकबर शेख या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105, 106(1), 281, 125(A), 125(B), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 अन्वये अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बिद्री पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!