Homeराजकीयदौंडच्या राजकारणात मोठी घडामोड! युवासेना तालुकाप्रमुख समीर भोईटे यांचा एकनाथ शिंदे यांच्या...

दौंडच्या राजकारणात मोठी घडामोड! युवासेना तालुकाप्रमुख समीर भोईटे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

✍️संदिप बारटक्के

मुंबई | दौंड तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना तालुकाप्रमुख समीर पोपटराव भोईटे यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती. या पक्षप्रवेशामुळे दौंड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.

समीर भोईटे यांनी गेल्या काही वर्षांत युवासेनेच्या माध्यमातून दौंड तालुक्यात युवकांचे संघटन उभारणे, विविध सामाजिक उपक्रम राबविणे तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम केले आहे. युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क असून, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.

त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला दौंड तालुक्यात संघटनात्मक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः युवकांमध्ये असलेला त्यांचा प्रभाव आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पक्षप्रवेशानंतर समीर भोईटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. सचिनभाऊ अहिर यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. शिवसेनेची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, दौंड तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. जनतेचा विश्वास संपादन करून विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्य देणे हेच माझे ध्येय राहील.”

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समीर भोईटे यांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांनी समीर भोईटे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.

या पक्षप्रवेशामुळे दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात इतर काही पदाधिकारी व कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दौंडच्या राजकारणात या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!