Homeक्राईम1 लाख 40 हजार रुपयांच्या सिगारेट बॉक्स वर अज्ञात चोरट्याचा डल्ला.... दौंड...

1 लाख 40 हजार रुपयांच्या सिगारेट बॉक्स वर अज्ञात चोरट्याचा डल्ला…. दौंड शहरातील घटना।

✍️ अख्तर काझी

दौंड: दौंड शहरातील व्यापाऱ्यास सिगारेटचा माल देण्यासाठी बारामतीहून आलेल्या व्यापाऱ्याचे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सचिन विजय पवार(वय 29,रा. माळेगाव, बारामती) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12. 45 वा. च्या दरम्यान दौंड शहरातील सिंधी मंगल कार्यालय परिसरातील शिवसागर ट्रेडिंग दुकान परिसरात घडली. फिर्यादी आर बी सिगारेट एजन्सी मध्ये कामाला असून दौंड येथील दुकानदारांना सिगारेटचा माल पुरविण्याचे काम करतात. फिर्यादी 28 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता बारामती येथील सिगारेट चा माल घेऊन पाटस येथे गेले. पाटस मधील दुकानदाराला माल देऊन ते 12.45 वा. च्या दरम्यान दौंडला आले. यावेळी शहरातील शिवसागर ट्रेडिंगला सिगारेट चा माल देण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी दुकानासमोर लावली व मालाची पिशवी घेऊन ते दुकानात गेले. यावेळी आपल्या सोबत असलेल्या सिगारेटच्या मालाची आणखीन एक पिशवी त्यांनी आपल्या दुचाकीला अडकविलेली होती. शिवसागर ट्रेडिंग चा माल देऊन अवघ्या पाच ते सात मिनिटातच फिर्यादी आपल्या दुचाकीकडे परतले असता दुचाकी ला अडकविलेली सिगारेटचा माल(32 बॉक्स, अंदाजे किंमत 1लाख 40 हजार 900 रु.) असलेली ती पिशवी त्यांना दिसली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात पिशवीचा शोध घेतला असता ती मालाची पिशवी त्यांना सापडली नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की सिगारेटचा माल ठेवलेली पिशवी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

या चोरीच्या घटनेनंतर परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासले असता चोरटा सिगारेटची पिशवी चोरताना स्पष्ट दिसत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन बोराडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

खडकवासला येथील धम्म विनया मॉनेस्टरीमध्ये ‘धम्मामृत धम्मपद-अठ्ठकथा खंड २’चा प्रकाशन सोहळा संपन्न

  भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा, समता आणि बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था, पुणे यांच्या वतीने धम्म विनया मॉनेस्टरी, खडकवासला,...

error: Content is protected !!