✍️ अख्तर काझी
दौंड: पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी , मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस ,सामाजिक कार्यकर्ता उमेश जगदाळे यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी गर्दी केली होती. हीच त्यांच्या मैत्रीची व सामाजिक कामाची पावती आहे अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिल्या.
शहर व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच विविध पक्ष , संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेश जगदाळे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या पुढील काळातही उमेश यांच्या हातून समाजाची उत्तम प्रकारे सेवा घडो असा आशीर्वादही त्यांना यावेळी देण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















