Homeशहरसंस्कार प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये ‘विविध गुणदर्शन’ सोहळ्यातून अजितदादांना अनोखी श्रद्धांजली

संस्कार प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये ‘विविध गुणदर्शन’ सोहळ्यातून अजितदादांना अनोखी श्रद्धांजली

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड शहरातील संस्कार प्रायमरी अँड हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन व ‘विविध गुणदर्शन’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल कुल, नगरसेवक योगेश कटारिया, जिवराज पवार, अमोल काळे, डॉ. शलाखा लोणकर, डॉ. रोहन खवटे, युवा नेतृत्व सतीश थोरात, नगरसेवक वसीम शेख, निलेश पवार, नगरसेविका सौ. वैशाली माशाळकर, सौ. रुचिता कटारिया, नगरसेवक राजू बारवकर, बंटी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, विविध लोकनृत्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत रंगत आणली. श्री./सौ. धर्माधिकारी यांनी अजितदादा यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा सादर केला. या सादरीकरणामुळे सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले आणि उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच ‘कांतारा’ या चित्रपटातील पात्रांची प्रभावी साकारणी करण्यात आली. या पात्रांच्या वेशभूषेसाठी कलाशिक्षक संतोष वाखरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विषयावर आधारित नाटिकेला प्रेक्षकांनी उभे राहून भरभरून दाद दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित नाटिकेदरम्यान सभागृह घोषणांनी दणाणून गेले. सर्व नृत्य व नाटिकांसाठी रोहित सर, केदार सर, श्री./सौ. धर्माधिकारी, मदने सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला आणि क्रीडा क्षेत्राची जोड आवश्यक आहे.” त्यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान सुनिता मिनिगी यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन कुबेर पवार व अनुष्का शेलार यांनी केले, तर सुशांत पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी सजलेला हा ‘विविध गुणदर्शन’ सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!