Homeउद्योगभिमा पाटसला मोठा दिलासा! प्रशासक नियुक्तीला स्थगिती; संचालक मंडळ कायम

भिमा पाटसला मोठा दिलासा! प्रशासक नियुक्तीला स्थगिती; संचालक मंडळ कायम

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

पाटस : सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत भिमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला थेट सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ जैसे थे राहणार असल्याची माहिती संचालक तुकाराम भिकोबा ताकवणे यांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी दिलेल्या आदेशाविरोधात ताकवणे यांनी मंत्रालयात धाव घेतली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत दिलेल्या या आदेशावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने स्थगिती दिल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

माहितीनुसार, पुणे विभागाच्या प्रादेशिक संयुक्त संचालक (साखर) यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश दिला होता. या आदेशामुळे भिमा सहकारी साखर कारखाना, पाटस येथील प्रशासकीय कामकाजात मोठे बदल होण्याची शक्यता होती. मात्र हा निर्णय एकतर्फी असून नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप ताकवणे यांनी केला आहे.

याविरोधात त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम १५२ व १५४ अंतर्गत ‘रिव्हिजन अप्लिकेशन’ दाखल करत मंत्रालयाचे दार ठोठावले. या प्रकरणात प्रादेशिक संयुक्त संचालक यांच्यासह नियुक्त प्रशासकीय समितीचे अध्यक्ष व सदस्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

सहसंचालकांनी आदेश देताना नैसर्गिक न्यायदानाच्या तत्वांचा भंग झाला का, तसेच नियुक्त समितीच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता होती का, असे महत्त्वाचे प्रश्न या अर्जातून उपस्थित करण्यात आले आहेत. सहकार क्षेत्रातील राजकीय व प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, मंत्र्यांच्या स्थगितीनंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

गवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

  पवन साळवे गवळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवळवाडी येथे डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान...

error: Content is protected !!