Homeउद्योगदौंड तालुक्यात ऊस दरवाढीची घोषणा; भीमा पाटसचा ऐतिहासिक गाळप विक्रम

दौंड तालुक्यात ऊस दरवाढीची घोषणा; भीमा पाटसचा ऐतिहासिक गाळप विक्रम

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

पाटस — एम.आर.एन. भीमा शुगर अँड पॉवर प्रा. लि. (निराणी शुगर्स लि.), पाटस, ता. दौंड या कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५–२६ साठी प्रति टन ऊसाला ₹३१००/- पहिला हप्ता देण्यात आलेला आहे.

आता दिनांक १६ जानेवारीनंतर गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन ₹२००/- अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असून, त्यामुळे ऊस दर ₹३३००/- प्रति टन होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली.

हंगाम २०२५–२६ साठी आलेल्या उसाचा अंतिम दर दौंड तालुक्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने देण्यात येईल, असे आश्वासनही आमदार राहुल कुल यांनी दिले.
कारखान्याने दि. १२ जानेवारीपर्यंत ५,४०,८४८ मे.टन ऊस गाळप केले असून, ५,३१,०५० क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.३४ टक्के इतका आहे.

डिस्टिलरी प्रकल्पातून आतापर्यंत ८,८८,४८६३ लिटर उच्च प्रतीचे इथेनॉल तसेच २६,७७,३२१ लिटर रिक्टिफाईड स्पिरिट उत्पादन करण्यात आले आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पातून २,१७,५९,५३७ युनिट्स वीज निर्मिती झाली असून, त्यापैकी १,६७,५८,२३७ युनिट्स स्ववापर करून ५१,८२,२०० युनिट्स वीज निर्यात करण्यात आली आहे.

यावर्षी कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात ११,००० मे.टन ऊस गाळपाचा विक्रम करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली. तसेच, सभासद शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे, तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व युनियन पदाधिकाऱ्यांचे निराणी ग्रुपचे अध्यक्ष श्री. मुरुगेश निराणी, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर श्री. संगमेश निराणी, कार्यकारी संचालक श्री. विजय निराणी व संचालक श्री. विशाल निराणी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

गवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

  पवन साळवे गवळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवळवाडी येथे डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान...

error: Content is protected !!