Homeमहत्त्वाचेदौंड नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीवर गंभीर आक्षेप; अपात्र ठरविण्याची ॲड. सुशांत सुरेश...

दौंड नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीवर गंभीर आक्षेप; अपात्र ठरविण्याची ॲड. सुशांत सुरेश वाघमारे यांची मागणी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड – दौंड नगरपरिषदेतील नागरिक हित संरक्षण मंडाळाचे स्वीकृत नगरसेवक राजू भीमराव बारवकर यांच्या नियुक्तीवर गंभीर कायदेशीर व नैतिक आक्षेप घेत अर्जदार ॲड. सुशांत सुरेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सदर तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राजू बारवकर यांची नियुक्ती ही ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ तसेच ‘महाराष्ट्र नगरपरिषद (सदस्यांचे नामनिर्देशन) नियम, २०११’ यांच्या तरतुदींचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असलेली ‘विशेष तज्ज्ञ’ अट बारवकर पूर्ण करत नाहीत. त्यांच्या शपथपत्रात व्यवसाय ‘वीट सप्लायर’ असा नमूद असून, तो कायद्यानुसार अपेक्षित असलेल्या व्यावसायिक किंवा तज्ज्ञ गटात मोडत नाही.

नियमांनुसार, सामाजिक क्षेत्रातून निवड होण्यासाठी संबंधित व्यक्ती किमान ५ वर्षे नोंदणीकृत संस्थेची पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र, उपलब्ध कागदपत्रांनुसार बारवकर हे केवळ साधारण सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.तसेच तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, बारवकर यांच्या विरोधात बलात्कार, विनयभंग, अपहरण तसेच शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला यांसारखे गंभीर गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. याशिवाय अलीकडेच आणखी एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली असून, ते सध्या फरार असल्याचीही शहरात जोरदार चर्चा आहे.

स्वीकृत नगरसेवक पदावर तज्ज्ञ व स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींना स्थान देण्याचा उद्देश असताना, अशा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीची नियुक्ती ही नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे अर्जदाराचे मत आहे.

तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे अध्यक्ष विवेक गटणे यांनी दि. १२ मे २०२६ रोजी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातही संबंधित व्यक्तीचे नाव तक्रारीत नमूद असल्याची माहिती समोर आली असून, या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सदर प्रकरण तपासाधीन आहे.

ॲड. सुशांत सुरेश वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, संबंधित प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेऊन राजू बारवकर यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द करण्यात यावे व त्यांना अपात्र घोषित करावे. तसेच, हा निर्णय ३० दिवसांच्या आत घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!