Homeमहाराष्ट्रदौंड तालुक्यात शिक्षणाची क्रांती; शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते STEM लॅबचे उद्घाटन

दौंड तालुक्यात शिक्षणाची क्रांती; शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते STEM लॅबचे उद्घाटन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

गरदरेवाडी (ता. दौंड) — येथील जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक ‘STEM लॅब’ व बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यावेळी राज्यस्तरीय “गुढीपाडवा पट वाढवा” अभियानाचाही उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी यावेळी केले. “गरदरेवाडी येथील स्टेम लॅब ही ग्रामीण शाळा ‘हायटेक’ होत असल्याचे उत्तम उदाहरण आहे. तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिक शिक्षणाशी जोडण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “आदर्श आणि स्मार्ट शाळा उभारण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गरदरेवाडी शाळेतील आधुनिक सुविधा, स्टेम लॅब आणि प्रगत शैक्षणिक उपक्रम पाहून समाधान वाटते. ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यांचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळणे ही मोठी शैक्षणिक क्रांती आहे. दौंड तालुक्यातील हा प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक ठरेल.”

आमदार राहुल कुल यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी ही लॅब उभारण्यात आली आहे. शाळांमध्ये शिक्षणासोबतच खेळ, ध्यानधारणा आणि योग्य आहार यावरही विशेष भर दिला जात आहे. सीएसआर (CSR) व लोकसहभागातून तालुक्यातील इतर शाळांमध्येही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, उपसंचालक गणपत मोरे, पंचायत समिती सभापती सुखदेव चोरमले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची व स्टेम लॅबची पाहणी केली. गरदरेवाडी येथील ग्रामस्थ व शिक्षकांनी शाळेचा केलेला कायापालट सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!