वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : शहरामध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांवर दौंड पोलिसांनी धडक कारवाई करत ८० हजार रुपये किंमतीच्या पिस्तुलसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दौंड पोलीस स्टेशन गुन्हा र.नं. 189/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत फिर्याद असीफ नबीलाल शेख (सहा पोलीस फौजदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26 मार्च 2026 रोजी रात्री 11.10 वाजण्याच्या सुमारास दौंड येथील हुतात्मा चौक परिसरातील रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी इरफान उर्फ शेरखान शब्बीर खान (वय 22) हा बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून अंदाजे ८० हजार रुपये किंमतीचे ९ मिमी स्टील पिस्तुल व रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली.
चौकशीदरम्यान, हे शस्त्र विशाल प्रकाश काटकर (वय 30) याने ठेवण्यासाठी दिल्याचे समोर आले. पुढील तपासात विशाल काटकर याला हे शस्त्र सोनू उर्फ बिल्ला उर्फ पद्माकर शांताराम ताडे (रा. कुंभार गल्ली, दौंड) याने दिल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इरफान खान व विशाल काटकर यांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर (स्थानिक गुन्हे शाखा), दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, सहाय्यक पोलीस फौजदार असिफ शेख, पोलीस हवालदार सचिन घाडगे, योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, किरण राऊत, आमिर शेख, सुभाष राऊत, अक्षय कुंभार, संजय कोठावळे आदींनी सहभाग घेतला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उगले करत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























