Homeमहत्त्वाचेवृत्तवेध मarathi चा इम्पॅक्ट |नगरसेविकेचा दणका; ठेकेदार हलला, काम सुरू

वृत्तवेध मarathi चा इम्पॅक्ट |नगरसेविकेचा दणका; ठेकेदार हलला, काम सुरू

वृत्तवेध मarathi/ संदिप बारटक्के

दौंड : शहरातील प्रलंबित स्ट्रीट लाईट व विद्युत पोल संदर्भातील कामांना अखेर गती मिळाली असून वृत्तवेध मarathi च्या बातमी बरोबरच नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संबंधित कामांना प्रत्यक्ष सुरूवात झाल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी (दि.२६) रोजी वृत्तवेध मarathi ने
“करार झाला… पण काम कुठे”| स्ट्रीट लाईट कामात ठेकेदाराची दिरंगाई? ‘या’ नगरसेविकेचा प्रशासनाला थेट सवाल ,,,,या माथळा खाली बातमी प्रसिद्ध केली होती.

दौंड शहरातील विविध प्रभागांमध्ये स्ट्रीट लाईट बंद, विद्युत पोल दुरुस्ती प्रलंबित तसेच नवीन लाईट बसविण्याची मागणी प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात नगरसेविका स्वाती सावंत यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा केला होता.
तसेच संबंधित ठेकेदारांकडून कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

यानंतर वृत्तवेध मarathi ने आवाज उठवला व या विषयाला प्राधान्याने प्रसिद्धी देत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या दुहेरी दबावामुळे अखेर नगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार सक्रिय झाले असून शहरातील विविध भागांमध्ये स्ट्रीट लाईट दुरुस्ती, नवीन एलईडी बसविणे व विद्युत पोलची कामे सुरू झाली. प्रत्यक्षात आज प्रभाग क्रमांक ७ मध्ये काम सुरू झाले आहे.

नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी सांगितले की, “नागरिकांच्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण होणे गरजेचे आहे. कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.”
दरम्यान, सुरू झालेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून शहरातील अंधाराची समस्या कायमची दूर करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!