Homeताज्या बातम्यागणपती स्पेशल | दौंड शहरामध्ये महिलांच्या कलागुणांना मिळणार कौशल्याची जोड; १ ते...

गणपती स्पेशल | दौंड शहरामध्ये महिलांच्या कलागुणांना मिळणार कौशल्याची जोड; १ ते ७ सप्टेंबरदरम्यान मोफत प्रशिक्षण, नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंचा पुढाकार

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहरातील महिलांना विविध उपयुक्त कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच महिलांनी आत्मविश्वासाने स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांच्या पुढाकारातून ‘गणपती स्पेशल’ अंतर्गत महिलांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१ ते ७ सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे.

या उपक्रमामध्ये रांगोळी स्टिकर व वुलन रांगोळी मॅट, फ्लॉवर मेकिंग, नथ मेकिंग, साडी ड्रेपिंग, पूजा थाळी बनविणे, सुपारी बनविणे, फॅब्रिक पेंटिंग, सेल्फ मेकअप, रांगोळी प्रशिक्षण तसेच आरी वर्क आदी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण महिलांना मिळणार आहे.

१ सप्टेंबर – रांगोळी स्टिकर / वुलन रांगोळी मॅट
२ सप्टेंबर – फ्लॉवर मेकिंग
३ सप्टेंबर – नथ मेकिंग / साडी ड्रेपिंग
४ सप्टेंबर – पूजा थाळी / साडी ड्रेपिंग / सुपारी बनविणे
५ सप्टेंबर – फॅब्रिक पेंटिंग / सेल्फ मेकअप
६ सप्टेंबर – रांगोळी प्रशिक्षण
७ सप्टेंबर – आरी वर्क प्रशिक्षण

स्थळ : हुतात्मा चौक, जुनी नगरपालिका, जनकल्याण ऑफिस

दौंड शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, आपल्या कलागुणांना कौशल्याची जोड द्यावी आणि भविष्यात या कौशल्याचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी निर्माण करावी, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी केले आहे.

या प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असून इच्छुक महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

📞 नोंदणीसाठी संपर्क :
95035 91661 | 88069 59327
98819 86888 | 81492 43010

महिलांचे कौशल्य, महिलांचा आत्मविश्वास आणि महिलांचे स्वावलंबन” या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक उपयुक्त आणि सकारात्मक संधी ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड नगरीतील श्री चैतन्य हनुमान मंदिराच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्या चे आयोजन…. पुणे जिल्हा...

  ✍️ अख्तर काझी दौंड: धौम्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दौंड नगरीतील दौंडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य हनुमान मंदिरात श्री चैतन्य हनुमान, श्री दत्त महाराज, जरीआईमाता,...

दिव्यांगांसाठी स्कुटी अनुदानाची योजना सुरू करा; रमाई आवासचा रखडलेला निधी तातडीने द्या – जिल्हा...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्कुटी अथवा मोटारसायकल उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी, तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या बांधवांना...

दौंड मध्ये भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे आयोजन….. संत मदर तेरेसा...

  ✍️अख्तर काझी दौंड: भारतरत्न संत मदर तेरेसा यांची 116 वी जयंती शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने शहरातील संत मदर तेरेसा स्मारकास...

दौंड मध्ये प्रेषित मो. पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी…. सामाजिक उपक्रमांचे आयोजन।

  ✍️ अख्तर काझी दौंड: जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे समस्त मुस्लिम समाज...

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंच्या पुढाकारातून दौंडच्या महिलांना डिजिटल कौशल्यांची नवी भरारी

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम करून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून...

error: Content is protected !!