Homeशिक्षण-प्रशिक्षणकराड येथे व्यक्तिमत्व सादरीकरण स्पर्धेत कु. सायली ढेबे प्रथम

कराड येथे व्यक्तिमत्व सादरीकरण स्पर्धेत कु. सायली ढेबे प्रथम

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

सातारा : रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिला व्यक्तिमत्व सादरीकरण स्पर्धा 2026 आणि महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दि. १४ मार्च रोजी कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच महिलांमधील सुप्त कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व्यक्तिमत्व सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत १८ ते ३५ वयोगटात कु. सायली बाळू ढेबे (लेट. भैयासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी) हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्व सादरीकरण, आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि विविध फेऱ्यांमधील उत्तम कामगिरीच्या जोरावर तिने परीक्षकांची मने जिंकली. याबद्दल तिला सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच तीन हजार रुपयांच्या रोख पारितोषिकाने गौरविण्यात आले.

या स्पर्धेत दोन वयोगट ठेवण्यात आले होते. त्यामध्ये १८ ते ३५ वयोगट आणि ३६ ते ७५ वयोगट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा पार पडली. विविध क्षेत्रातून आलेल्या चाळीसहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत व्यक्तिमत्व सादरीकरण, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, विचार मांडणी आणि कलात्मक सादरीकरण अशा विविध निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले.

स्पर्धा तीन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. प्रत्येक फेरीत स्पर्धकांना आपले व्यक्तिमत्व, कौशल्य आणि विचार प्रभावीपणे सादर करण्याची संधी देण्यात आली. या सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कु. सायली ढेबे हिने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या संस्थेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि महिलांना शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य आणि नेतृत्व क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा उपक्रमांमुळे महिलांना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते तसेच समाजात सकारात्मक संदेश जातो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ कराडच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि स्पर्धक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!