Homeशिक्षण-प्रशिक्षणशिक्षणासोबत समाजसेवेची शिकवण; संस्कार स्कूलचा स्तुत्य उपक्रम

शिक्षणासोबत समाजसेवेची शिकवण; संस्कार स्कूलचा स्तुत्य उपक्रम

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य करणारे संस्कार प्रायमरी ॲड हायस्कूल दौंड हि संस्था विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे परिसरात वेगळी ओळख निर्माण करत आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शाळेचे संस्थापक जयंत पवार यांच्या पुढाकारातून दौंड येथील स्मशानभूमीस आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचावा तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या सुविधांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने जयंत पवार सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या संकल्पनेतून आणि संस्कार स्कूलच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम साकारण्यात आला.

या कार्यक्रमास अमरधाम स्वच्छता समितीचे विश्वस्त सचिन कुलथे, निखिल स्वामी, मोहन नारंग, संदिप बोराडे, संस्कार स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनिता मिनिगी तसेच दौंड नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात व परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज राहावा यासाठी फावडे, पाण्याच्या बादल्या, झाडू, सुपल्या, कचराकुंडी, लोखंडी बाके तसेच इतर उपयुक्त साहित्य प्रदान करण्यात आले. या साहित्यामुळे अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार असून स्मशानभूमीच्या देखभालीलाही हातभार लागणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्कार स्कूलच्या या समाजहित उपक्रमाचे तसेच संस्थापक जयंत पवार यांच्या सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक केले. शिक्षणासोबतच सामाजिक मूल्यांची जोपासना करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची प्रेरणा निर्माण होते, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

संस्कार स्कूलने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. जयंत पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्कार स्कूलवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!