Homeमहाराष्ट्रशाळांजवळील घातक शीतपेयांवर सरकारचा चाप; राहुल कुल यांच्या प्रश्नानंतर मोठी घोषणा

शाळांजवळील घातक शीतपेयांवर सरकारचा चाप; राहुल कुल यांच्या प्रश्नानंतर मोठी घोषणा

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

राज्यातील शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी शाळा व महाविद्यालय परिसरात विकल्या जाणाऱ्या घातक शीतपेये, कटिंग पान आणि दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहीम राबविणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी विधानसभेत केली. आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.

आमदार राहुल कुल यांनी सभागृहात शाळांच्या परिसरात विकल्या जाणाऱ्या ‘स्टिंग’सारख्या एनर्जी ड्रिंक्स, आरोग्यास अपायकारक कटिंग पान आणि विविध फ्लेव्हर्ड मिल्कच्या वाढत्या विक्रीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. काही ठिकाणी या उत्पादनांमध्ये कृत्रिम रंग, अतिरिक्त साखर आणि अंमली पदार्थांचा वापर होत असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा उत्पादनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून राज्यव्यापी मोहीम राबविण्याची मागणी त्यांनी केली.

याचबरोबर राज्यातील दुधातील भेसळ हा गंभीर प्रश्न असल्याचे नमूद करत, बहुतांश मिल्क कलेक्शन सेंटर्सवर तपासणी सुविधा नसल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. अन्न नमुन्यांमध्ये सदोष आढळणाऱ्या कंपन्यांचे संबंधित बॅच बाजारातून तात्काळ मागे घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, राज्यात सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे अत्याधुनिक अन्न चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. तसेच पुणे, नाशिक, रायगड आणि यवतमाळ येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर आणखी २२ प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

मंत्र्यांनी पुढे सांगितले की, पूर्वी अन्न नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी सुमारे तीन महिने लागत होते. मात्र, नवीन कार्यपद्धतीमुळे आता एका महिन्याच्या आत अहवाल उपलब्ध होत असून पुढील महिन्यापासून हा कालावधी आणखी कमी करण्यात येणार आहे. सदोष आढळणाऱ्या कंपन्यांची नावे सभागृहाच्या पटलावर ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी मतदारसंघातील तसेच राज्यातील बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नागरिकांना निर्भेळ अन्न व दूध उपलब्ध करून देण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!