वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
सकल हिंदू मातंग समाज, दौंड शहर आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती ची बैठक हॉटेल योगराज येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी समितीची नवीन कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी आकाश तुपसौंदर्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी आकाश पवार, कार्याध्यक्षपदी सूरज दिवटे, सचिवपदी निखिल ससाणे आणि उपसचिवपदी सूरज खुडे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीस पत्रकार योगिता रसाळ, छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शौर्य पाटील, तसेच नरेश ससाणे, सिद्धेश कदम, धीरज दिवटे, साहिल खंडागळे, अजित फुटाणे, अभीजीत लबडे, रितेश घोडे, बाळू तुपसौंदर्य, शुभम तुपसौंदर्य, सौरव आगलावे, ओंकार खुडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाची साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती लहुजी यंग ब्रिगेड यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष नितीन तुपसौंदर्य यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत, जयंती उत्सव समाजातील एकोपा, सामाजिक सलोखा आणि युवा सहभागाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीत जयंती उत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली यंदाची जयंती उत्सव अधिक भव्य आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























