Homeआरोग्यदौंडमध्ये ‘श्री गणेश आरोग्य अभियान–२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५० हून अधिक नागरिकांची आरोग्य...

दौंडमध्ये ‘श्री गणेश आरोग्य अभियान–२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

✍️ संदिप बारटक्के

दौंड : श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियान–२०२६ अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालयाला मदत फंडाच्या माध्यमातून सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र, बेबेल कॉलनी, इंदवाड रोड, दौंड आणि बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन दौंड नगरीच्या उपनगराध्यक्षा छाया थोरात तसेच प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका नमिरा पानसरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी भाजप दौंड शहराध्यक्ष रितेश ओझा, शहर उपाध्यक्ष राहुल भंडारी, नागेश बेलुरकर, प्रकाश पारदसानी, रवी बंड, तसेच भाजप दौंड शहर महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष मोनाली वीर आणि उपाध्यक्षा सीमा शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला दौंड नगरीच्या नगरसेविका वैशाली माशाळकर, सामाजिक कार्यकर्ते युनूस पानसरे, आशिष मेमाणे, तसेच रुपेश कटारिया आणि रमेश कटारिया यांनीही भेट देऊन शिबिराला शुभेच्छा दिल्या.

शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत रक्त तपासणी व सल्ला, मोतीबिंदू तपासणी व मार्गदर्शन, विविध डोळ्यांच्या आजारांची तपासणी, तसेच महिला, बालक आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

या उपक्रमाचा १०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ, तर २५० हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा त्यांच्या जवळच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे नागरिकांना विविध आरोग्यविषयक तपासण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळाले.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश हॉस्पिटलच्या साई गौरी कुल तसेच त्यांच्या संपूर्ण टीम चे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे हा आरोग्य उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात पार पडला.

“आपले आरोग्य… आपली जबाबदारी!” या संदेशातून नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!