Homeआरोग्यनगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांची धडाकेबाज सुरुवात | स्वच्छतेसाठी स्वतः उतरल्या मैदानात

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांची धडाकेबाज सुरुवात | स्वच्छतेसाठी स्वतः उतरल्या मैदानात

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : दौंड नगरपरिषदेच्या वतीने दौंड शहर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. स्वच्छ सर्वेक्षण,२०२६ अंतर्गत माझी वसुंधरा अभियान आज महालक्ष्मी हॉस्पिटल परिसर व सरपंच वस्ती परिसर येथे उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी स्वतः झाडू हातात घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन जनजागृती तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष स्वच्छता उपक्रमात सहभाग घेत शहर स्वच्छतेचा दृढ संकल्प व्यक्त केला.

यावेळी उपनगराध्यक्षा छायाताई थोरात, आरोग्य सभापती कार्तिकीताई सोनवणे, गटनेते जीवराज पवार, इंद्रजीत जगदाळे, नगरसेविका उज्वलाताई परकाळे, वैशालीताई माशाळकर, मनीषा जाधव तसेच नगरसेवक मुकेश जगताप, विकास लोंढे व सर्व सन्माननीय नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग उपस्थित होते.

“स्वच्छ दौंड – हरित दौंड” हा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी नागरिकांनी सातत्याने सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी केले. शहराला स्वच्छतेत अग्रस्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

वाहतूक कोंडीपासून शेतकरी-क्रीडा विकासापर्यंत; आमदार राहुल कुल यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ महत्त्वाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा

  वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, जलसंधारण आणि क्रीडा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर आमदार राहुल कुल यांनी...

error: Content is protected !!