Homeआरोग्यजागतिक महिला दिनानिमित्त 'पाटील' हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; आजी-माजी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य...

जागतिक महिला दिनानिमित्त ‘पाटील’ हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; आजी-माजी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दौंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरनोत गल्ली परिसरातील पाटील हॉस्पिटल च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये हिमोग्लोबिन (रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाण) तपासणी १२७, रक्तातील साखर तपासणी १२७, ईसीजी (हृदय तपासणी) ९०, त्वचा तपासणी व उपचार २२३, केस गळती व कोंडा उपचार १८० तसेच चामखीळ अल्प दरात काढणे २३ अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा एकूण २२६ महिलांनी लाभ घेतला.

या प्रसंगी दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे, माजी नगराध्यक्षा शीतलताई योगेश कटारिया, नगरसेविका रेणुका विजय थोरात, सरोज बाबलू कांबळे तसेच उज्वला मनीष परकाळे यांनी शिबिराला भेट देऊन महिलांशी संवाद साधला व उपक्रमाचे कौतुक केले.

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व महिलांना गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित नगराध्यक्षा व नगरसेविकांचा मोगऱ्याचे व लिलीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरादरम्यान महिलांना मोठ्या स्क्रीनवर त्वचा व केसांच्या विविध आधुनिक उपचार पद्धतींबाबत माहिती देणारे व्हिडिओ दाखविण्यात आले. यामुळे महिलांना आरोग्याविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

या आरोग्य शिबिराचे आयोजन पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. शिल्पा स्वप्नील पाटील व डॉ. स्वप्नील पाटील यांनी केले. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!