Homeमहत्त्वाचेDaund | उड्डाणपूल चौकातील वाढत्या अपघातांवर महिलांचा आवाज; सीसीटीव्ही व सुरक्षा उपायांसाठी...

Daund | उड्डाणपूल चौकातील वाढत्या अपघातांवर महिलांचा आवाज; सीसीटीव्ही व सुरक्षा उपायांसाठी दौंड तहसीलदारांना निवेदन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | शहरातील उड्डाणपूल चौक परिसरात वारंवार होत असलेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी दौंड शहरातील महिला भगिनींनी दौंड तहसीलदारांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. ७ जुलै २०२६ रोजी उड्डाणपूल चौक परिसरात सारिका कंकाळे यांचा अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने गंभीर अपघात झाला. परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने संबंधित वाहनाचा शोध घेणे कठीण झाले. तसेच अपघातानंतर तात्काळ मदत मिळण्यास व रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यापूर्वीही तुकडोजी विद्यालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एका आठ वर्षीय चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने दौंड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उड्डाणपूल चौक परिसरात तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महिलांनी दिलेल्या निवेदनात उड्डाणपूल चौक हा पुणे, अहिल्यानगर आणि बारामती या प्रमुख मार्गांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असल्याचे नमूद केले. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, शाळा परिसरातील सूचना फलक तसेच इतर आवश्यक सुरक्षा सुविधा नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी उड्डाणपूल चौक परिसरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत,प्रमुख चौकात व उड्डाणपूल परिसरात वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावण्यात यावेत,शाळा परिसर – सावकाश वाहन चालवा व “School Ahead” असे सूचना फलक बसविण्यात यावेत,तसेच आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर आणि झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात यावी,अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांचे फलक लावण्यात यावेत,वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी नियमित जनजागृती मोहीम राबविण्यात यावी,उड्डाणपूल चौक परिसरातील रस्ते सुरक्षेचे सर्वेक्षण करून आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात याव्यात.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी महिलांनी केली.

यावेळी मनीषा मिलिंद संसारे, सारिका महावीर गरुड, सिमरन प्रेम खवळे, रमिला कातकडे, निना जोसेफ, कंचनमाला धिंडे, संगीता मोरे, माधुरी ढवळे, रोहिणी ढवळे, जयश्री माने आणि सुनिता वांटे उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

error: Content is protected !!