✍️ अख्तर काझी
दौंड: परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके व सामाजिक, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे व राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या निर्देशनानुसार महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी पुणे जिल्ह्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी यावेळी निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, देशातील विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियांमधील कथित पेपरफुटी घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे देशातील वीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पक्षाच्यावतीने पाठिंबा जाहीर करीत आहोत तसेच आंदोलनकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांनाही पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी दिल्लीतील आंदोलन चिरडणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खरात, दिगंबर रिकीबे, संजय आयरल्लू, शशांक गायकवाड, अनिल धेंडे, मनीषा संसारे, सारिका गरुड, सिमरन खवळे, रमिला कातकडे, नीना जोसेफ, कंचनमाला धेंडे, कालिका कांबळे, संगीता मोरे ,रोहिणी ढवळे, सुनीता वंटे, जयश्री माने ,आनंद ओव्हाळ, अनिकेत रणसिंग, अभय भोसले तसेच भीम कन्या ग्रुप आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























