HomeशहरDaund | भिमनगर येथील उघड्या गटारीचा प्रश्न ऐरणीवर; नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांचे...

Daund | भिमनगर येथील उघड्या गटारीचा प्रश्न ऐरणीवर; नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांचे अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : दौंड शहरातील भिमनगर परिसरातील नागरिकांना उघड्या गटारीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून या प्रश्नाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. भिमनगर येथील समाज मंदिरापासून एक मोठी गटार जात असून ती पूर्णपणे उघड्या स्वरूपात आहे. ही गटार मूळतः पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आली असली तरी त्यामध्ये सध्या मैलाचे व सांडपाणी सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या गटारीमुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून विविध साथीच्या आजारांचा धोका देखील वाढला आहे.

स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा दौंड नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच गटारीवर झाकण बसविण्याची आणि त्यामध्ये सोडले जाणारे मैलाचे पाणी तात्काळ बंद करण्याची मागणीही केली आहे. मात्र अद्याप या मागण्यांवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, उघड्या गटारीतून मैलाचे पाणी सोडणे तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा भिमनगर परिसरातील नागरिक स्वखर्चाने गटार बंद करण्याचा निर्णय घेतील आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील.

भिमनगर परिसरातील नागरिकांचा हा प्रश्न नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दखल घेतली. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “Do it as soon as possible” असे स्पष्ट निर्देश देत नागरिकांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे भिमनगर येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरात लवकर गटारीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!