वृत्तवेध मarathi नेटवर्क
दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात पार पडली. या महासभेत नवीन मंडळ कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
AISMAचे मुख्य सचेतक धनंजय चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महासभेला AISMAचे माजी महासचिव अरोरा सर, सेंट्रल रेल्वेचे महासचिव आलोक कुमार, ZFS सकिल इनामदार, माजी ZFS काशिकर साहेब, जीपी, डी. के. सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महासभेला पुणे मंडळातील सुमारे ५० स्टेशन मास्टर्स उपस्थित होते. मंडळाचा मागील कार्यकाळातील लेखाजोखा सादर केल्यानंतर नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली.
पुणे मंडळाच्या सचिवपदासाठी प्रथमच मतदान
पुणे मंडळाच्या इतिहासात प्रथमच मंडळ सचिव (DS) पदासाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत दिनेश रवींद्र कांबळे यांना ४९ मते, तर संजय पाचपुते यांना १ मत मिळाले. त्यामुळे दिनेश रवींद्र कांबळे यांची पुणे मंडळ सचिवपदी दणदणीत निवड झाली.
नवीन मंडळ कार्यकारिणीत पुणे मंडळ अध्यक्षपदी पुरुषोत्तम सिंह (स्टेशन मास्टर, दौंड) तर मंडळ कोषाध्यक्षपदी राज सोनवणे (स्टेशन मास्टर, पुणे) यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी
मंडळ सचिव : दिनेश रवींद्र कांबळे, स्टेशन मास्टर, पुणे
मंडळ अध्यक्ष : पुरुषोत्तम सिंह, स्टेशन मास्टर, दौंड
मंडळ कोषाध्यक्ष : राज सोनवणे, स्टेशन मास्टर, पुणे
दिनेश रवींद्र कांबळे यांच्या निवडीबद्दल रेल्वे कर्मचारी आणि AISMAच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















