Homeक्राईमदौंड तालुक्यातील सोनवडी गावातील रस्ता कामांमध्ये भ्रष्टाचार.... दोषींवर कारवाई न झाल्याने सामाजिक...

दौंड तालुक्यातील सोनवडी गावातील रस्ता कामांमध्ये भ्रष्टाचार…. दोषींवर कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्याचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

✍️अख्तर काझी

दौंड: दौंड तालुक्यातील सोनवडी गावातील रस्ता कामांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसह विविध गंभीर तक्रारीवर आज पर्यंत कोणतीही प्रभावी कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सचिन काकडे यांनी दौंड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

सचिन काकडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पुणे जिल्हा पालकमंत्री, नगर विकास मंत्री ,पुणे जिल्हाधिकारी, दौंड तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक दौंड यांना याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे सोनवडी येथील आश्रम शाळेमागील रस्ता कामांमध्ये 1 लाख 85 हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, सोनवडी गावातील अर्जुन यादव घर ते सुरेश लोंढे घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामामध्ये 1लाख रुपयांचा आर्थिक अपहार व गैर व्यवहाराची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, ग्रामपंचायत सोनवडी येथील आपले सरकार सेवा केंद्र(CSC ID 156336130017) चा अनधिकृत वापर तथा 50 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार व अपहाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, ग्रामपंचायत सोनवडी येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवा पुस्तकातील 17 दिवसांच्या रजेची नोंद आणि त्याच कालावधीत हालचाल नोंदवही मध्ये ग्रामपंचायतीत उपस्थिती दर्शविण्यात आल्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यास तत्काळ निलंबित करावे व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या सचिन गायकवाड यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केलेल्या आहेत तसेच या सर्व प्रकरणांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नाही. संपूर्ण प्रकरणांमध्ये न्याय मिळावा व संबंधित दोषीची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जावे या उद्देशाने आमरण उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!