Homeसामाजिकदौंड शहरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद् भागवत कथा सप्ताहास उत्साहात प्रारंभ

दौंड शहरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद् भागवत कथा सप्ताहास उत्साहात प्रारंभ

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : पुरुषोत्तम मास (अधिक मास) निमित्त भागवत कथा सत्संग मंडळ, दौंड व श्री विठ्ठल प्रासादीक भजनी मंडळ, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहास श्री विठ्ठल मंदिर, दौंड येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला.

या कथा सप्ताहासाठी परमपूज्य श्री स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज (कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या) यांचे शुभाशीर्वाद लाभले आहेत. कथा प्रवक्ता आचार्य श्री महेशजी व्यास हे आपल्या ओजस्वी वाणीमधून श्रीमद् भागवत महापुराणातील विविध प्रसंग, अध्यात्म, भक्ती, धर्म आणि जीवनमूल्यांचे महत्त्व भाविकांना पटवून देत आहेत.

दिनांक ५ जून ते ११ जून २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ८ या वेळेत कथा संपन्न होत असून, कथा श्रवणासाठी दौंड शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. कथा स्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि भागवत रसपानाचा लाभ भाविकांनी घ्यावा.

आचार्य महेशजी व्यास यांनी कथा निरूपणात श्रीमद् भागवताचे महत्त्व विशद करताना मानव जीवनात सदाचार, सेवा, भक्ती आणि ईश्वरभक्तीचे स्थान अधोरेखित केले. भागवत कथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भागवत कथा सत्संग मंडळ व श्री विठ्ठल प्रासादीक भजनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. कथेच्या समाप्तीनंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे राजेंद्र ओझा व रामेश्वर मंत्री यांनी सांगितले आहे.

या पवित्र ज्ञानयज्ञाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे अध्यक्ष ॲड. गोपाळ नगरकर व सचिव अशोक जगदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!