Homeक्राईमदेऊळगाव राजेतील मंदिरात चोरट्यांचा धुमाकूळ; सिद्धेश्वराचा ३ किलो चांदीचा मुकुट लंपास

देऊळगाव राजेतील मंदिरात चोरट्यांचा धुमाकूळ; सिद्धेश्वराचा ३ किलो चांदीचा मुकुट लंपास

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड — दौंड पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भानुदास रामदास औताडे (वय 75 वर्षे), रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.२) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात चोरीची घटना घडली.

मंदिरातील काचेच्या कपाटामध्ये ठेवलेला सुमारे ३ किलो वजनाचा, नागाच्या फणीची आकृती व खडे जडवलेला चांदीचा मुकुट (किंमत अंदाजे १,९५,००० रुपये) अज्ञात चोरट्याने कपाटाचा दरवाजा उघडून चोरी करून नेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सदर प्रकरणी पोलीस हवालदार शिंदे (ब.नं. 3326) यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण (ब.नं. 286) करीत आहेत.

पोलीसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!