Homeक्राईमहजार लिटर दुधात ५०० लिटर रसायने-शॅम्पू; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यानंतर भेसळखोरांना...

हजार लिटर दुधात ५०० लिटर रसायने-शॅम्पू; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यानंतर भेसळखोरांना दणका

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

एक हजार लिटर दुधामध्ये तब्बल ५०० लिटर रासायनिक पाणी व शॅम्पूसदृश पदार्थ मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत समोर आली आहे. दूध भेसळीचा मुद्दा विधानसभेत सातत्याने उपस्थित करणारे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यभर सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली.

प्राथमिक तपासानुसार, ५०० लिटर शुद्ध दुधात सुमारे ३०० लिटर, तर १,००० लिटर दुधात तब्बल ५०० लिटर रासायनिक पाणी मिसळले जात होते. दुधाचे प्रमाण आणि घट्टपणा वाढवण्यासाठी वास न येणारा शॅम्पूसदृश पदार्थ, दूध पावडर आणि विविध घातक रसायनांचे मिश्रण वापरून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

हे भेसळयुक्त दूध नामांकित दुग्धव्यवसाय कंपन्यांना पुरवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दुधापासून तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ लहान मुलांसह सर्वसामान्य ग्राहकांच्या आहारात पोहोचत असल्याने या प्रकारामुळे गंभीर आरोग्याचा धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने सुमारे ३६ तास विशेष मोहीम राबवून राज्यातील २३ ठिकाणांवरील दूध डेअऱ्यांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात दूध, खवा, रासायनिक पदार्थ आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेत दूध भेसळ, शीतपेयांवरील नियंत्रण आणि अन्नसुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी करणारे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यानंतरच राज्यभर ही विशेष तपास मोहीम सुरू झाल्याची चर्चा असून, या कारवाईमुळे भेसळखोरांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!