Homeमहत्त्वाचेशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी |पाटस येथे कृषी बाजार आवाराचा मार्ग मोकळा, १० एकर...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी |पाटस येथे कृषी बाजार आवाराचा मार्ग मोकळा, १० एकर गायरान जमीन बाजार समितीला मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मौजे पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील गट क्रमांक ८९० मधील १० एकर शासकीय गायरान जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड यांना नवीन बाजार आवार उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.

महसूल व वन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन ज्ञापन जारी केले असून, ही जमीन केवळ नाममात्र १ रुपया दराने कब्जेहक्काने उपलब्ध करून देण्यास शासनाने पूर्वमंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पाटस व परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सुसज्ज, आधुनिक आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार राहुल कुल यांनी या प्रश्नासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत राज्य शासनाने ही जमीन पणन संचालक, पुणे यांच्या नावावर भोगवटादार वर्ग-२ म्हणून मंजूर केली आहे. शासनाच्या अटींनुसार या जागेवर तीन वर्षांच्या आत बाजार आवाराचे काम सुरू करणे बंधनकारक असणार आहे.

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले. या निर्णयामुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाला गती मिळेल, तसेच व्यापारी व्यवहार अधिक सुलभ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निर्णयाचे दौंड तालुक्यासह पाटस परिसरातील शेतकरी आणि व्यापारी वर्गातून स्वागत होत असून, आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले जात आहे.

“पाटस आणि परिसरातील शेतकरी बांधवांसाठी हे नवीन बाजार आवार मैलाचा दगड ठरेल. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणी शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी या जागेचा मोठा फायदा होईल. आमच्या मागणीला तातडीने मंजुरी देऊन जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.”

— आमदार अॅड. राहुल कुल, दौंड विधानसभा मतदारसंघ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!