✍️ संदिप बारटक्के
दौंड : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि वीरधवल जगदाळे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे तसेच ज्येष्ठ नेते नंदू पवार यांच्या हस्ते दौंड शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे म्हणाले, ज्येष्ठांचा सन्मान ही आपली संस्कृती असून ती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेणे अत्यंत मोलाचे आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सन्मान, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक इंद्रजित जगदाळे, दौंड नगरपरिषदेचे गटनेते जिवराज पवार, नगरसेवक विकास लोंढे, मुकेश जगताप, मंगेश चलवादी, नगरसेविका स्वाती सावंत, प्रणिता शिंदे, राणी लष्करे, साधना सोनवणे, तसेच अनिल साळवे, दीपक सोनवणे, अनिल जगताप, जाकीर शेख यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, वीरधवल जगदाळे युवा मंचचे सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल स्वामी यांनी केले.
सन्मानित ज्येष्ठ नागरिक दत्ताजी शिनोलीकर,प्रतापशेठ लुंड, शांतीलाल शेठ मुनोत, हिराकाकू उंडे, सानेबाई, ॲड. विलास बर्वे, युसुफभाई इनामदार, आबासाहेब वाघमारे, नागनाथ जुमाळे, काका कावळे, बाळासाहेब साळुंके, विवेक संसारे, डॉ. एल. एस. बिडवे, नारायण लंगोटे, सगन आगलावे, जफरुल पठाण, मंगलताई वाघ, पोपटशेठ टाटिया, महेताबभाई शेख, सुमंतीलाल कटारिया आणि राजाभाऊ निंबाळकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























