Homeमहत्त्वाचेपी.एम.पी.एम.एल. बस सेवा दौंड शहरापर्यंत सुरू करा; प्रहार संघटनेची आमदार राहुल कुल...

पी.एम.पी.एम.एल. बस सेवा दौंड शहरापर्यंत सुरू करा; प्रहार संघटनेची आमदार राहुल कुल यांच्याकडे मागणी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पी.एम.पी.एम.एल.) बस सेवा हडपसर ते पाटसपर्यंत सुरू असून या सेवेचा अनेक सामान्य प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. मात्र ही बस सेवा दौंड शहरापर्यंत, विशेषतः दौंड रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने आमदार राहुल कुल यांच्याकडे करण्यात आली आहे.

सध्या पुण्याकडे जाणाऱ्या अनेक शालेय विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, नोकरदार, व्यापारी तसेच सामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दौंड रेल्वे स्टेशनवरून सकाळी ८.२० वाजता सुटणाऱ्या बारामती डेमो रेल्वेनंतर पुण्याकडे जाण्यासाठी दुसरी रेल्वे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेल्या अनेक गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.

दौंड शहरासह सिध्दटेक, देऊळगाव राजे, शिरापूर, लिंगाळी, सोनवडी, काष्टी, श्रीगोंदा या परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांना पुण्याकडे जाण्यासाठी एस.टी. बसची वाट पाहावी लागते. अनेकदा या बस पूर्ण भरून येत असल्याने प्रवाशांना जागा मिळत नाही. तसेच काही बस बिरोबावाडी येथे नाश्त्यासाठी अर्धा ते एक तास थांबत असल्याने प्रवाशांचा पुढील प्रवास उशिरा होतो.

रेल्वेतील जनरल डब्यांची संख्या कमी झाल्यामुळे जनरल डब्यांची क्षमता साधारण १५० ते २०० प्रवाशांची असताना हजारो तिकीटे विकली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य प्रवाशांना एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करणे कठीण होत आहे.

या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हडपसर ते पाटसपर्यंत धावणारी पी.एम.पी.एम.एल. बस सेवा दौंड शहरापर्यंत, विशेषतः रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू केल्यास शालेय विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, नोकरदार, व्यापारी व सामान्य प्रवाशांची मोठी सोय होईल. तसेच अर्ध्या तासाच्या अंतराने बस उपलब्ध झाल्यास पी.एम.पी.एम.एल.च्या उत्पन्नातही वाढ होईल, असे संघटनेने नमूद केले आहे.

या मागणीवेळी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री, दौंड शहर अध्यक्ष कलीम तांबोळी, रेणुका चव्हाण, शेहनाज शेख, राजू गायकवाड, राजू कृपलानी, शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष गणेश पवार तसेच रेल्वे प्रवासी, विद्यार्थी व व्यापारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!