Homeशिक्षण-प्रशिक्षणपाटस येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

पाटस येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

वृत्तवेध मarathi/ संदिप बारटक्के

गुरुकुल शिक्षण संस्था संचलित कै. एम. व्ही. भागवत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती बालदिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. विठ्ठल खामकर सर होते. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष सोनवणे गुरुजी, पाटस गावच्या विद्यमान सरपंच इंदुमती शितोळे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. तृप्तीताई भंडलकर, उपसरपंच बाबा कोळेकर, माजी उपसरपंच श्री. अरुण अण्णा भागवत, श्री. स्वप्निल भागवत, सौ. छायाताई भागवत, डॉक्टर चव्हाण मॅडम, समाजसेवक श्री. गुलाब भागवत, सत्कर्म फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अशोक नागरगोजे तसेच पालक, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा व उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य विठ्ठल खामकर सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

तसेच शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा तसेच विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. कोळेकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमास बहुसंख्य पालक व मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!